Tuesday, 29 April 2014

Shankar Maharaj (शंकर महाराज)


                     || जय जय शंकर सद्गुरुनाथ ||


      दिव्यत्वाची जेथे प्रचीती | तेथे कर माझे जुळती ||  हे अगदी सत्य आहे. पण याही पुढे मला म्हणावेसे वाटते. “भव्य दिव्याची जेथे प्रचीती | तेथे माझी फक्त शरणांगती ||” पुण्यातील धनकवडीचे श्री शंकर महाराज यांच्या बद्दल हेच उद्गार बोलावे लागतील. 


      जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती पण हा तर सर्व संत विभूतीचा हि बाप, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर , असे अध्यात्मात जगणारा, नव्हे नव्हे आपल्या भक्तांनाही असेच परखड जगायला शिकविणारा हा सद्गुरु साक्षात शिवाचा अवतार होय. कार्तिक शुद्ध अष्टमीला अयोनी प्रगट झालेले महाराज शरीराने अष्ट वक्र होते. भैरावाचे रुपेही आठच आहेत. एका भैरावाच्या ठिकाणी हनुमंताच्या दहा पट शक्ती असते. आठ भैरावाची शक्ती महाराजांच्या ठिकाणी आहे. यावरूनच महाराजांच्या अचाट सामर्थ्याची कल्पना येते. म्हणूनच मी सुरुवातीला भव्य दिव्याची शरणांगती असे बोललो. 



       
श्री शंकर महाराज प्रत्यक्षात महादेव होते, त स्वत:च सांगत .....

                मैं कैलास का रहनेवाला |

                मेरा नाम है शंकर ||




 

            अध्यात्मातील वैष्णव, शैव, दत्त, नाथ आदि सर्व संप्रदायाचे ते अधिकारी होते . म्हणूनच ते आदिनाथ होते . अध्यात्मातील सर्व प्रकारच्या शक्तींवर त्यांची सत्ता होती. पण त्यांनी कधीही सिद्दींचा वापर स्वत:ही केला नाही व दुसऱ्याला करू दिला नाही. महाराज म्हणायचे, ‘सिद्धीच्या मागे लागू नका, माझ्या बह्यांगाला भुलू नका !’ महाराजांना ओळखण्यासाठी स्वत:ला प्रथम ओळखणे आवश्यक आहे. ‘स्वत:स कोणी ओळखील, तो मज निश्चित जाणेल’ असे अभिवचन ते देत असत. 



      श्री शंकर महाराजांचे सद्गुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आहे. श्री शंकर महाराज म्हणतात, जो माझ्या सद्गुरूचे स्मरण करेल नाव घेईल त्याचे काम मी स्वत: करील. जसे रामाचे नाव घेता हनुमंत धावून येतो. तसे स्वामी समर्थ नाव घेता श्री शंकर महाराज येतात. यावरून स्वामी समर्थ कोण आणि शंकर महाराज कोण, हे सांगायची गरज नाही. अध्यात्मातील प्रत्येक संप्रदायाची प्रत्येक गोष्टीची तार एकमेकांशी जुळलेली असते. त्याचा जो व्यवस्थित अभ्यास करतो वा निरीक्षण करतो, त्याला लगेच कळेल. पण यासाठी पहिले स्वत:च्या अंतरंगात शिरणे गरजेचे आहे. ज्याने स्वत:चे अंतरंग जाणले, त्याला ब्रम्हांडाचे रंग समजायला लागतात. शंकर महाराज आपल्या भक्तांना याच अंतरंगात घेवून जातात. फक्त आपल्या मनाची तयारी हवी कारण अध्यात्म हा शूर वीरांचा खेळ आहे. यासाठी निधड्या छातीचे भक्त हवेत. तुकाराम महाराज सुद्धा म्हणत असत “ हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे म्हणून अध्यात्मात साधनेला दुसरा पर्याय नाही. जे पर्याय शोधतात ते अध्यात्म जगात नाहीत, फक्त सोंग करतात अशांच्या नादी न लागलेले बरे, शंकर महाराज दारू प्यायचे पण भक्ताला ज्ञानाचा प्रकाश दाखवायचे. त्याला आत्मसाक्षात्कार घडवाचे. सिगरेट प्यायचे, पण वास समोरच्या भक्ताच्या तोंडाला यायचा. हे सर्व करण्यामागे त्यांचा एकच उद्देश होता. त्यांना जगाला सांगायचे होते कि तुम्ही सद्गुरूचे आचरण बघू नका, फक्त चरण पहा आणि सद्गुरूंवर तुमची निष्ठा, प्रेम वाढवा.


      महाराजांच्या याच शिकवणीवर आमच्या नागपूर येथील गोपाल नगरातील श्री शंकर महाराज दरबाराची अध्यात्मिक वाटचाल सुरु आहे. येथे प.पूज्य.श्री देशपांडे महाराजांच्या अधिपत्याखाली अनेक भक्तांची अध्यात्मिक उन्नती होत आहे. सद्द्गुरुची भक्ती, सद्द्गुरूवर प्रेम कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण आमचे श्री. देशपांडे महाराज आहेत. त्यांच्या प्रेमापोटीच तो धनकवडीचा योगी इथे नागपुरात आमच्या दरबारात नित्य नांदतो आहे व नव्या नव्या अनुभूती देतो आहे.



श्री शंकर महाराज दरबार

३१, नलावडे ले-आउट,

पडोळे हॉस्पिटल जवळ,

गोपाल नगर, नागपूर.

Website : www.shankarmaharajdarbarnagpur.org